माझी लाडकी बहीण योजना (Majhi ladki bahin yojana) महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1500 दिले जात होते, जे महिलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करते आणि त्या आत्मनिर्भर बनतात.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लातूर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ६ लाख अर्जांची लवकरच छाननी केली जाणार आहे. या छाननीत, संबंधित महिलांचे अर्ज सरकारच्या योजनेच्या निकषांनुसार योग्य आहेत का, त्यांना अन्य योजनांमधून १,५०० रुपयांपेक्षा जास्त निधी मिळतो का, घरात चारचाकी वाहन आहे का, आणि घरातील सदस्य सरकारी नोकरदार आहेत का, याची तपासणी केली जाईल. यामुळे काही महिलांना मिळणाऱ्या निधीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण’ योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. या योजनेमुळे महायुती सरकारला महिलांकडून मोठ्या प्रमाणावर मतदान मिळाले. त्यानंतर, शपथविधी सोहळ्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना सुरूच राहील, आणि लाभाच्या रकमेत वाढ करून १,५०० ऐवजी २,१०० रुपये देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. योजनेतील पात्र महिलांची फेरपडताळणी केली जाईल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, प्रशासनाने अर्जांची फेरपडताळणी सुरू केली आहे. या प्रक्रियेत, महिलांनी संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर सरकारी योजनांमधून लाभ घेतला आहे का, हे तपासले जाईल. तसेच, त्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे का, त्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत का, याबाबतचे तपासणी करून निकषाच्या बाहेर असलेल्या महिलांना दिला गेलेला निधी थांबवला जाऊ शकतो.
माझी लाडकी बहीण योजना (Ladki BahinYojana) काय आहे?
लडक्या-बहिणी योजना महिलांना योग्य शिक्षण, सुरक्षितता, आणि आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेचा फायदा घेऊन अनेक मुली जीवनात यश मिळवू शकतात आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये आर्थिक आणि सामाजिक स्थिरता निर्माण होऊ शकते.
आर्थिक मदतीत वाढ: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेत दरमहा मिळणारी आर्थिक मदत ₹1500 वरून ₹2100 केली आहे.
थेट बँक खात्यात जमा: ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा होईल.
राज्यभरातील महिलांसाठी: ही योजना राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी मोठे पाऊल आहे.
नवीन अद्ययावत माहिती: योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अद्यतनांसाठी ladakibahin.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
माझी लाडकी बहीण योजना – पात्रता निकष (2024) | Ladki Bahin Eligibility
- वय मर्यादा: अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे.
- स्थायिकता: अर्जदार महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर जन्मलेल्या महिलांना, जर त्या महाराष्ट्रातील स्थायिक व्यक्तीच्या (पतीच्या) पत्नी असतील आणि पतीचे रहिवासी प्रमाणपत्र प्रदान करू शकतील, अर्ज करण्याची परवानगी आहे.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- वैवाहिक स्थिती: विवाहित आणि अविवाहित दोन्ही महिला अर्ज करू शकतात.
- व्यवसाय: अशा महिला पात्र आहेत ज्या शेतमजुरी करतात, स्वयंरोजगारात आहेत किंवा ज्यांना निश्चित वेतन मिळत नाही.
- बँक खाते: आधारशी जोडलेले सक्रिय बँक खाते असणे आवश्यक आहे, कारण आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी खालील महिला अपात्र असतील | Non Eligible women for Ladki Bahin Yojana
- ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
- ज्या महिलांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
- ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार-खासदार आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
योजनेचा उद्देश आणि सुरुवात
मध्य प्रदेशातील मेरी लाडली बहन योजनेच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र सरकारने जुलै 2023 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मासिक आर्थिक सहाय्य दिले जाते. सुरूवातीला महिलांना 1500 रुपयांची मदत मिळत होती, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने यामध्ये सुधारणा करत रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात आली आहे.